कोणत्याही परिस्थितीत या युगातील एकलव्याला द्रोणाचार्याला अंगठा अर्पण करावा लागणार नाही...
विद्यापीठांचे सामाजिक जीवन दलित-आदिवासी विद्यार्थ्यांसाठी न्याय्य व स्वागतार्ह नाही. शैक्षणिक संस्थांचे सामान्य कामकाज सामाजिक अभिजनांच्या चिंता आणि त्यांच्या हितसंबंधांभोवती फिरते. सामाजिकदृष्ट्या उपेक्षित गटातील विद्यार्थ्यांची उपस्थिती, ही जणू काही त्या संस्थेच्या पारंपरिक संस्कृतीसाठी धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना नोकरीच्या बाजारपेठेत प्रबळ सामाजिक अभिजनांकडून तिरस्काराची वागणूक दिली जाते.......